Loading...

आपल्या करोडोंच्या कमाईचं काय करतो विराट ?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

जगातील निवडक फलंदाजांपैकी एक भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली प्रचंड लोकप्रियता प्राप्त असलेला खेळाडू आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्याचे अनेक फॅन्स आहेत. विराट कोहली आज ज्या यशस्वीतेच्या शिखरावरती उभा आहे त्या पर्यंत पोहोचनं हे प्रत्येक क्रिकेटपटुचं स्वप्न असतं आणि सहाजिकच जेवढा खेळाडू मोठा आणि लोकप्रिय असतो तेवढीच त्याची कमाई देखील भरपूर असते, त्यासोबतच खर्चदेखील असतोच.

विराट कोहली बद्दल अनेक ठिकाणी तुम्ही वाचल असेलचं, त्यामुळेच आज आपण विराट कोहली बद्दल न जाणून घेता त्याच्या खर्चाबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विराट कोहली त्याने कमावलेला पैसा कशा पद्धतीने खर्च करतो.

Loading...

5 पाणी : विराट कोहली सामान्य माणसांप्रमाणे, साधारण पाणी पीत नाही. विराट कोहली पाणी पिण्यासाठी वापरतो ते पाणी फ्रान्स मधून मागवलं जातं. ज्याची किंमत किमान पंधरा दिवसांसाठी 36 हजार रुपये एवढी असते.

4. कार कलेक्शन : विराट कोहली त्याच्या आलिशान लाइफस्टाइल साठी प्रचंड प्रसिद्ध आहे. आजकाल तरुणाई देखील विराट कोहलीचं बघून त्याच्याप्रमाणेच वागायचा प्रयत्न करत असतात. विराट कोहलीकडे फार मोठं असं कार कलेक्शन उपलब्ध आहे. विराट कोहली कडे रेंज रोवर, बीएमडब्ल्यू, ऑडी यासारख्या अनेक महागड्या व आलिशान गाड्या आहेत. विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये सर्वात महाग गाडी ही ऑडी R8 आहे ज्याची किंमत 2.47 कोटी एवढी आहे.

3 बिजनेस : तुम्ही जर असा विचार करत असाल विराट कोहली फक्त क्रिकेट खेळून आणि जाहिराती करूनचं पैसे कमावतो
तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात कारण विराट कोहली याने भरपूर प्रमाणात इन्वेस्टमेंट देखील केलेली आहे. विराट कोहलीचे दिल्लीत एक हॉटेल देखील आहे. ज्या हॉटेलच्या माध्यमातून विराट कोहली एका वर्षात जवळपास एक मिलियन डॉलर एवढी कमाई करतो. यासोबतच विराट कोहली ने 90 करोड रुपये एका फिटनेस सेंटर मध्ये देखील खर्च केलेले आहेत.

Loading...

2. वॉलेट : विराट कोहली Louis Vuttion या कंपनीचे वॉलेट वापरतो. जे सर्वाधिक महागड्या वॉलेट पैकी एक समजले जाते. याची किंमत जवळपास 1250 डॉलर्स एवढी आहे.

1. घर : विराट कोहली जवळ अनेक घरं आहेत पण त्यातील त्याच्या मालकीचे सर्वात महाग घर दुबईमध्ये आहे. 2016साली विराट कोहलीने दुबईमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटची किंमत 34 करोड रुपये एवढी सांगितली जाते.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.