भारतीय वायू सेनेत विंग कमांडर व्हायचंय? त्यासाठी काय हवी योग्यता? किती मिळणार वेतन? जाणून घ्या……

0

भारतीय स्थल सेना, वायू सेना, आणि भारतीय नौ सेना. तीनही जेव्हा एकवटतात त्यावेळी महा पराक्रम घडतो. हे आजपर्यंत भारतीय सेनांनी जगाला दाखवून दिलं आहे. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय हे भारतीय इतिहासात सतत आपण अभ्यासलं आहे. देशाशी इमान आणि शत्रूचा बीमोड, ही भारतीय पराक्रमाची परंपरा राहिली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी भारतीय सेना शौर्य गाजवत आली आहे.

नुकत्याच भारतीय वायू सेनेनं केलेल्या दोन सर्जिकल स्ट्राईक मुळे भारतीय तरुण ह्या पराक्रमी सौरक्षण दलांकडे आकृष्ट झाले आहेत. आपणही असा पराक्रम करू शकू ही भावना आज तरुणांमध्ये जागृत झाली आहे. योग्य मार्गदर्शन, आणि घरातून पाठिंबा मिळाला की हे तरुण देश सेवा करायला सरसावतात. आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहेनतीच्या जोरावर मोठ्या मोठ्या पदावर चढत जातात.

भारतीय वायू सेनेनं केलेल्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन आज अनेक तरुण वायुदलात भरती होण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांना प्राथमिक स्तरावर योग्य माहिती मिळाली तर त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.आपल्या वायुदलात जाण्यासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असणे जरुरीचे आहे ?

वायुदलात भरती होण्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड मेहेनत, कामामध्ये मनापासून झोकून देण्याची तयारी असली पाहिजे. प्रामाणिकपणा हा प्रत्यक्ष तरुणांमध्ये असायलाच हवा, आणि आपल्या देशाबद्दल उत्कट प्रेम आणि देशासाठी समर्पण भावना असलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी धाडस निर्माण करतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असायलाच पाहिजेत.

शैक्षणिक पात्रता :भारतीय वायुदलात भरती होण्यासाठी फिजिक्स आणि मॅथस् ह्या दोन्ही विषयासह १२ वी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चा अर्ज भरून प्रवेश घ्यायला लागतो.ह्या प्रवेशासाठी वयाची मर्यादा १६ वर्षे ते १९ वर्षे इतकी आहे.

जर १२वी नंतर प्रवेश घेता आला नाही तर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर सुद्धा प्रवेश घेता येतो. त्यासाठी ‘कंबाईन डिफेन्स सर्विस’ ची परीक्षा (CDS Exam) द्यावी लागते आणि प्रवेश मिळतो. ह्या परीक्षे साठी वय १९ वर्षे ते २३ वर्षे , ह्याच्या दरम्यान असावे लागते. वायुदलात भरती होण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवार हा ‘अविवाहित’ असला पाहिजे. लग्न झालेल्यांना प्रवेश घेता येत नाही.

शारीरिक चाचणी सुद्धा घेतली जाते आणि त्यानंतर प्रवेश दिला जातो. आता शारीरिक चाचणी घेताना कोणत्या गोष्टी बघितल्या जातात? तर ५ गोष्टी तपासल्या जातात. १- वायुसेनेत भरती होणारा प्रत्येक उमेदवार हा शरीराने सुदृढ सशक्त असला पाहिजे, कोणतेही शारीरिक व्यंग ,किंवा अपंग व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. कोणताही रोग, आजार असता कामा नये.

२- भरती होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची छाती श्वास घेऊन ५ सेंटीमीटर फुगली पाहिजे, त्यापेक्षा कमी असणाऱ्याला प्रवेश मिळत नाही. ३- उमेदवाराची शरीराची सगळी हाडे आणि सांधे ह्यामध्ये कोणताही रोग, आजार अथवा कमतरता असलेल्या उमेदवाराला प्रवेश नाकारला जातो.

४- कान , नाक आणि घसा ह्याची तपासणी केली जाते. ह्या तीनही गोष्टीत कोणताही दोष किंवा रोग नाही ना ह्याची तपासणी केली जाते. कान, नाक, घसा ह्यात काही दोष आढळला तर प्रवेश मिळू शकत नाही.  ५- पाचवी आणि महत्वाची तपासणी म्हणजे दृष्टी. प्रत्येक उमेदवाराची नजर तीक्ष्ण असायला पाहिजे. मुख्य म्हणजे त्याची लांबची दृष्टी ही खूप चांगलीच असायला पाहिजे. कोणताही दृष्टी दोष असेल तर आपल्याला वायुदलात प्रवेश मिळत नाही.

सुरुवातीला ट्रेनिंग च्या काळात प्रत्येक उमेदवाराला स्टायपेंड दिला जातो. ह्या स्टायपेंड ची रक्कम असते दरमहा रु- २१०००/-. आणि त्यानंतर वायुसेनेत सेवेत रुजू झाल्यावर वेतन दिले जाते , फ्लाईंग अलाऊन्स रु.९०००. सह हे एकूण वेतन रु.५११७०/- इतके दरमहा दिले जाते. प्रथम फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट,स्क्वाड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमोडर, एअर व्हाईस मार्शल, एअर मार्शल, आणि एअर चीफ मार्शल अशा पद्धतीने एक एक रँक स्वकर्तृत्वावर आपल्याला मिळवता येते. रँक बरोबर वेतनही वाढत जाते.

इतकी चांगली नोकरी आणि इतके चांगले वेतन मिळत असेल तर खरे देशप्रेम असणाऱ्या प्रत्येक तरुणाने वायुदलात भरती होणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्यासारखेच आहे. मग हीच वेळ आहे देशप्रेम, धडाडी, समर्पण, कर्तृत्व, दाखवण्याची. संपूर्ण देश तुमच्या ह्या कर्तुत्वाला सलाम करेल.आणि सन्मानाचीच वागणूक तुम्हाला मिळेल. “”गर्व आहे आम्हाला आम्ही भारतीय असण्याचा.”” || जय हिंद |

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!