आचार संहिता म्हणजे नक्की असतं तरी काय मंडळी..?? सांगतो, वाचा..!!

0

सगळ्या देशाचे लक्ष ज्यावर लागून राहिले होते त्याची घोषणा आज झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित झाली. ११ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत टप्प्या टप्प्याने देशभर निवडणुका घेऊन, २३ मे ला त्याचा निकाल जाहीर केला जाईल. जशी ही घोषणा झाली तशी, उलटसुलट चर्चांना जणू उधाणच आलंय.. कोण म्हणतो राहू काळातच केलीये तर अशुभ आहे.. तर कोण म्हणतंय निवडणुकीची प्रक्रिया भलतीच लांबवली आहे..

बरेच जण आता लागू झालेल्या आचार संहिते बद्दलही बोलत आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यावर आता देशभर लागू होते ही आचार संहिता.. ह्याचा सोप्प अर्थ असा की कोणी कसे वागावे, काय बोलावे ह्याचे कडक नियम लागू होतात. ह्याची मुख्य बाब अशी की आचार संहिता इतकी कटाक्षाने पाळली जावी लागते की तिच्या नियमांचा भंग करणाऱ्यां वर कडक कारवाई तर होतेच आणि निवडणुकांची तारीख देखील बदलली जाऊ शकते.

असे नक्की काय नियम असतात भाऊ..?? आज जाणून घेऊयात..

१. प्रत्येक पार्टीने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी इलेक्शन कमिशन कडे द्यावी. २. निवडणुकांना उभ्या असलेल्या उमेदवारांचा सगळं खसरच तपशीलवार निवडनुक आयोगाला सादर करावा. सोशल मीडियावर केलेला खर्च देखील हैस्तच गृहीत धरला जाईल.

३. आचार संहिता लागू झाल्यावर लोकहिताचे आणि मत मिळवून देणारे कोणतेही कार्यक्रम आता करता येणार नाहीत. उदा. भूमिपूजन, काही गोष्टींचे लोकार्पण, कशाचे उदघाटन इत्यादी. ४. आचार संहितेच्या काळात सरकारला कोणत्याही प्रकारच्या नवीन घोषणा करता येणार नाहीत

५. कोणत्याही राजकीय पक्षाला रात्री १० नंतर आणि पहाटे ६ पर्यंत कुठल्याही प्रकारची रॅली, प्रचार सभा घेता येणार नाही. ६. प्रचाराच्या भाषणांमध्ये कोणतेही प्रक्षोभक विधान, समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करता येणार नाही. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही ह्यांव्ही काळजी घेणे आवश्यक.

७. मतदारांना कसलेही प्रालोभन देण्यास सक्त मनाई असेल. ह्या मुद्यावर तर निवडनुक देखील रद्द करण्याचे आदेश आयोग देऊ शकते. ८. सरकारी वाहने देखील ह्या काळात वापरता येणार नाहीत.

९. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पदवी. कोणतीही गटबाजी, गैरवर्तन होणार नाही ह्यासाठी आयोग संपूर्ण लक्ष ठेवेल. प्रचार सभांचे रेकॉर्डिंग देखील होईल. जेणे करून प्रत्येक उमेदवाराच्या भाषणावर लक्ष देता येईल.

तर मंडळी वरील पैकी कोणत्याही नियमांचा आणि निवडणूक आयोगाने सांगितलेल्या शिस्तीचा भंग होणे म्हणजे आचार संहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे सगळ्याच पक्षांना ह्याचे पालन करणे अपरिहार्य आहे..!!

आता आपण असेही म्हणून शकतो की, ‘अभी तो पार्टी शुरू हुवी है..’ आणि २३ मे लाच काय तो सोक्षमोक्ष लागेल..  तर मंडळी आता बघायला सज्ज व्हा पॉलिटिकल मज्जा..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!