काय आहे जम्मू काश्मीर इतिहास भूगोल जाणून घ्या.

0

आपला ‘भारत’ देश अनेक संकटं झेलून इतर राष्ट्रांच्या मानाने खूपच कणखर देश बनला आहे. भारतावर अनेक परकीय सत्तांनी डोळा ठेऊन त्यावर कब्जा करायचा प्रयत्न गेली अनेक वर्षे झाला. पण भारतीयांनी, भारतीय सेनेनी ह्या सगळ्या आक्रमणांना परतवून लावलं. सगळ्यात जास्त काळ इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. भारतातली संपत्ती लुटून नेली. पण शेवटी भारतीय जनतेच्या जोरदार प्रतिकारापुढं इंग्रजांना सुद्धा नमतं घ्यावं लागलं आणि भारतातून इंग्रज निघून गेले.

भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण धर्माच्या नावाखाली पुन्हा भारतात दुफळी झाली आणि पाकिस्तान जन्माला आलं. हे पाकिस्तान दोन भागात विभागलं गेलं होतं, एक पूर्व पाकिस्तान, आणि दुसरा पश्चिम पाकिस्तान. पण त्यात सुद्धा पुन्हा विभागणी झाली आणि १९७१ साली बांगला देश वेगळं झालं.

भारताचा जम्मू काश्मीर हा भाग आधी हिंदू राज्यांच्या ताब्यात होता. नंतर १७५६ मध्ये अफगाणी सत्तेखाली हा भाग होता. त्यानंतर १८१९ ह्या काळात जम्मू काश्मीर हा अकबराच्या मुगल सत्तेखाली आला. नंतर शीख सत्तेत हा भाग अनेक वर्षे होता.शीख राजा रणजीत सिंह ह्या भागाचा राजा होता . आत्ताचा पाकिस्तान हा जम्मू काश्मीर जवळच असल्यामुळे १९४७ ते १९४८ ह्या काळात इतर दहशतवादी संघटनांना जवळ करून पाकिस्ताननं जम्मू काश्मीर मिळवण्याचा सतत प्रयत्न केला.

खूप मोठा हल्ला करून काश्मीर मिळवण्याचा प्रयत्न केला, खूप मोठी लढाई झाली, भारतीय सेना जोरदार मुकाबला करत होती. आणि पाकिस्तानने मिळवलेला भू भाग परत मिळवण्याचा लढा देत होती. पण भारताचे त्या वेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय सेनेला युद्ध थांबवण्याचा एकतर्फी आदेश दिला. आणि पाकिस्तान ने मिळवलेला भू भाग पाकिस्तान कडेच ठेऊन भारत आणि पाकिस्तानची सीमा रेषा तयार करून दिली.

त्यावेळी पाकिस्तान कडे काश्मीरचा काही भाग तसाच राहिला. त्या मुळे त्या भागाला पाक व्याप्त काश्मीर असं म्हटलं जातं. खरा तर तो भाग भारताचाच आहे. जम्मू-काश्मीर-लडाख हे तीन वेगवेगळे विभाग म्हणून ओळखले जात होते. पूर्वी ह्या भागांवर एकच राजा राज्य करत होता. म्हणून स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी ह्या भू भागांचा नीट विचार न करता ह्या संपूर्ण भागालाच एक राज्य म्हणून घोषित केलं.

जम्मू: जम्मू मध्ये १० जिल्हे येतात: जम्मू,सांबा,कठुआ, उधमपूर,डोडा,पुंछ, राजौरी,रियासी,रामबन, आणि किस्तवाड. ह्याचं एकूण क्षेत्रफळ ३६३१५ स्क्वे. कि. मी. आहे पण त्यातलं १३२९७ स्क्वे. कि. मी. हे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. १९४७ ते १९४८ ह्या दरम्यान पाकिस्तानने ह्या भागावर कब्जा केला. त्यामुळे भिम्बर, कोटली,मीरपूर, पुंछ,हवेली,बाग, सुधांती, मुजफ्फराबाद, हट्टीया हे जिल्हे पाकिस्तानच्या कब्जात आहेत.

काश्मीर: जम्मूच्या पीर पंजाल ह्या डोंगराळ भागापासून काश्मीर सुरू होतं. काश्मीर चं क्षेत्रफळ १६००० स्क्वे. कि. मी. एवढं आहे. काश्मीरचेही१०जिल्हेआहेत,श्रीनगर,बडगाम,फुलगाम,पुलवामा,आनंतनाग,कुपवाडा,बारामुला,शोपिया,गंदरबल,बांडीपूरा. काश्मीरमध्ये सुन्नी मुस्लिम जास्त प्रमाणात आहेत, याशिवाय, शिया, बहावी,अमदिया, मुसलमानांबरोबर हिंदू, गुर्जर, राजपूत,ब्राह्मण राहतात. “दहशतवादाचा प्रभाव काश्मीर घाटी भागात काश्मिरी बोलणाऱ्या सुन्नी मुसलमानांपुरताच आहे.”

लडाख: हा उंच पठारी प्रदेश आहे हिमालय काराकोरम पर्वत रांगा आणि सिंधू नदीचा वरचा डोंगराळ प्रदेश इतका पसरलेला आहे. क्षेत्रफळ आहे ३३५५४स्क्वे. कि.मी. इतकं आहे. लडाखमधून सिंधू नदी उगम पावते आणि पाकिस्तानातल्या कराची पर्यंत वाहत जाते.

२०११ च्या जन गणने नुसार जम्मू काश्मीरची लोकसंख्या १,२५,४१,३०२. इतकी आहे. काश्मीर मध्ये सुन्नी मुसलमानांची संख्या जास्त आहे. तर जम्मू मध्ये हिंदू आणि शीख जास्त प्रमाणात स्थायिक आहेत. आणि लडाख मध्ये बौद्ध मोठ्या संख्येने स्थायिक झालेले आहेत. काश्मीर मधेच दहशतवादाला खत पाणी घालून देश विरोधी कारवाया केल्या जात आहेत. भारत स्वतंत्र झाल्या नंतर जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला गेला,काही सुविधा सुद्धा दिल्या गेल्या.

त्यामुळे आज हा भाग भारताचा असून सुद्धा भारतातल्या इतर राज्यातल्या लोकांना इथे जमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे, उद्यगांची कमतरता आहे आणि बेरोजगारी जास्त आहे. पण काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटनाला खूप मोठा वाव मिळाला आहे. बहुतेक लोकांची उपजीविका ह्या पर्यटनामुळे साधली गेली आहे. असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला काश्मीर हा जगभरातून पर्यटकांना आकर्षित करत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!