पुण्याचे भामटे, मुंबई चे भुरटे माहीत आहेत पण हे ‘ठग लाईफ’ म्हणजे नक्की काय असतं भाऊ..??

0

असं म्हणतात प्रत्येक भाषा दर शतकात बदलत जाते.. पूर्वी हा दर शतकांचा होता. मागच्या शतकात दशकांचा झाला आणि आता तर पाच पाच वर्षात आपल्याला नवनवीन शब्द ऐकायला मिळतात. भारतातच इतक्या भाषा आहेत आणि जेव्हा ह्यांची सुद्धा सरमिसळ होते तेव्हा आणखीन नवीन शब्दांची आपल्या ज्ञानात भर पडते. मिंग्लिश म्हणजे मराठी आणि इंग्लिश भाषा तर हिंग्लिश म्हणजे हिंदी मिश्रित इंग्रजी भाषा.. असे देशी परदेशी भाषांची भेळ सुद्धा झालेली आहे.

मुंबई सारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात तर मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, कन्नड, तेलगू, पंजाबी, इंग्लिश आणि इतरही काही भाषांचे शब्द असलेली एक मुंबैय्या भाषा बोलली जाते. मागच्या पिढीला काही शब्द काळात नसले तरी पुढची पिढी अपडेटेड असते..

खास तरुण पिढीची भाषा दर पिढीला बदलत असते. त्यातून आता तर डिजिटल जगात पोचलेली पिढी. सोशल मीडियावर इतके वेगवेगळे शब्दप्रयोग चालू असतात की आपल्याला ही सतत त्यांच्या अर्थासाठी गुगल करावे लागते. भारतीय शब्द कळे पर्यंत येतात नवनवीन पाश्चात्य शब्द.. असाच एक शब्द सध्या चालतीत आहे. तो म्हणजे ‘ठग लाईफ’..!!

आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ तर माहीत आहे. ठग म्हणजेच भामटे किंवा चोर.. मग ठग लाईफ म्हणजे चोरांचे आयुष्य.. अहो पण हा हिंदी शब्द नाहीचे मुळी.. हा तर आहे इंग्लिश शब्द.. मग चोरांचे आयुष्य अर्थ कसा होईल..?? आहे की नाही गम्मत..!!

सध्या सोशल मिडियावर बहुचर्चित असलेला हा ठग लाईफ तरुणांच्या अत्यंत आवडीचा शब्द आणि स्वॅग आहे. ठग लाईफ दाखवणारे व्हिडीओ सुद्धा यु ट्यूब, फेसबुक वर बघायला मिळतात. अतिशय मजेशीर वाटणारे हे व्हिडीओ तरुणांच्या कालाकारीचे नमुनेच आहेत जणू. पण काय असते ही ठग लाईफ नक्की..?

ठग लाईफ म्हणजे अत्यंत बेफिकीर, बिनधास्त लाइफस्टाइल.. भले अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात आधी पासून ठग हा शब्द इंग्रजी भाषेत वापरला जात होता आणि तो भारतातील ‘ठग’ ह्याच्या अर्थशीच मिळत जुळता होता, तरीही ठग लाईफ चा अर्थ चोरांचे आयुष्य होत नाही. रॅप गाण्यांच्या संस्कृतीतून आलेला हा शब्द आहे. रॅप गाणीच मुळात एकदम ‘कूल’ बिनधास्त अशी असतात आणि असेच बिनधास्त राहणारे रॅपर ठग लाईफ जगतात. स्नूप डॉग, टुपॅक ह्यांच्या सारख्या हिपहॉप गायकांनी ह्या शब्दाला आणि अशा प्रकारच्या लाईफ स्टाईल ला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.

भारतात सुद्धा खरं तर अशी ठग लाईफची उदाहरणं सिनेमांमधून बघायला मिळतात. जसे अमीर खान ने रंगीला मध्ये तर शाहरुख खान ने जोश मध्ये अगदी ठग लाईफ जगली आहे.. मात्र आपल्याकडे त्याला इतका ‘कूल’ शब्द नव्हता.. नाही का..!! तर मंडळी अशी बेफिकीर ‘ठग लाईफ’ तुम्ही कधी जगली आहे का..?? आम्हाला जरूर सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!