पोटगी हा काय प्रकार आहे? कोणकोणत्या स्वरूपात पोटगी दिली जाते?

0

एका लेखिकेने एका वृत्तपत्रात लिहिले कि “हुंडा, पोटगी अशा स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या आणि तिला दयाबुद्धीने पाहाणाऱ्या तरतुदी खरंच किती गरजेच्या आहेत याचा विचार व्हायला हवा. म्हणजे स्त्रियापण पुरुषांइतकेच कमावतात, त्यांना पोटगी कशाला हवी, असा तो विचार नव्हे, तर विवाह केला अथवा नाही केला, नोकरी केली किंवा नाही केली, ज्या कुटुंबांमध्ये संसाधने आहेत त्या कुटुंबांतील स्त्रियांच्या संपत्तीचे हक्कमहत्त्वाचे मानले गेले पाहिजेत.”

आणि त्या दिवशी माझा पहिल्यांदाच पोटगी या शब्दाशी संबंध आला. मला प्रश्न पडला कि पोटगी काय असते? ती कुणाला आणि का दिली जाते? फक्त स्त्रियांनाच दिली जाते का, घटस्फोटानंतरच दिली जाते का? पोटगी देण्याचेही प्रकार आहेत? मला कसं माहिती नाही? आणि मग मी याचा शोध घ्यायला आणि जवळपास असलेल्या आणि बसलेल्या लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली, आणि त्याचंच हे उत्तर.

आपल्याकडे नियमच आहे ते, कि अमुक अमुक व्यक्तीने तमुक तमुक व्यक्तीचे पालनपोषण करावे, त्यांची ती जबाबदारी आहे आणि जर त्यांनी पालनपोषण केले नाही तर मग कायद्याने त्या व्यक्तीकडून पालनपोषणाचा खर्च मागता येतो आणि याच पालनपोषणाच्या खर्चाला पोटगी म्हणतात. काही सामान्य उदाहरण बघितले तर घटस्फोटानंतर बायको नवऱ्याला पोटगी मागते, त्याला ती द्यावी लागतेच.

कधी कधी आई किंवा वडिलांपासून वेगळी राहणारी मुलं सुद्धा आपल्या पालकांकडून पोटगीची मागणी करतात. पोटगीचा विचार करताना माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा लक्षात घेतल्या जातात आणि सोबतच शिक्षण आणि आरोग्यासाठी लागू शकणारा खर्च देखील गृहीत धरला जातो.

पोटगीचेही प्रकार आहेत आणि त्यांसाठी वेगळी नियमावली देखील आहे. वृद्ध आई-वडिलांना आपल्या मुलाकडून आणि मुलीकडून सुद्धा पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी कायदा देखील आहे. हिंदू कायद्यान्वये औरस व अनौरस मुलांना बापाकडून अगर तो असमर्थ असल्यास आईकडून पोटगी मिळते.

विधवा महिलेला जर तिच्या कैलासवासी नवऱ्याच्या मालमत्तेतून, आई-वडिलांकडून किंवा मुलाकडून मिळण्याची शक्त्या नसेल तर तिला ती आपल्या सासुरवाडीतून मिळवता येते. हिंदू विवाहाच्या नवीन कायद्यान्वये विवाहविषयक दाव्यांत पत्नीला ज्याप्रमाणे पतीपासून त्याचप्रमाणे पतीला पत्नीपासून आर्थिक दुःस्थितीवरून पोटगी मिळू शकते.

मुस्लीम कायद्याप्रमाणे देखील बापानेच अज्ञान मुलाचे सोबतच अविवाहित मुलीचे संगोपन गेले पाहिजे. आईवडील गरीब असतील तर त्यांचा पालनकर्ता सुद्धा मुलगाच असतो. हिंदू कायद्याप्रमाणे इथे मात्र विधवा सुनेला पोटगी देण्याची जबाबदारी सासू-सासऱ्यांची नाहीये. जो पर्यंत बायको नवऱ्याजवळ राहत आहे तो पर्यंत तिचे पालन करण्याचे काम तिच्या नवर्याचे आहे.

आणि काही कारणास्त जर ते वेगळे राहत असतील तर बायको पोटगी मागू शकते.  जो पर्यंत बायको दुसरं लग्न करत नाही (त्यासाठी ठराविक वेळ आहे) तोपर्यंत तिच्या आधल्या नवऱ्याला पोटगी द्यावीच लागते. बायको जर व्यभिचारी असेल अथवा आपसात करार करून विभक्त राहत असेल, तर मात्र तिला पोटगी मिळत नाही. हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही कायद्यांत.

एकीकडे पुरुष प्रधान आहे म्हणून हे सगळं व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटते तर दुरीकडे आपण स्त्रियांना समानतेचा अधिकार देतोय तर त्यांनाहे सगळं देण्याची काही एक गरज नाहीये याची विचारांचे लोकं आपल्यासोबत आहेत. पोटगी चूक कि वाईट हे अजूनपर्यंत ठरवता आले नाही पण ठरलं कि त्यावर एक लेख नक्कीच लिहेन. जर हा लेख आवडला तर नक्कीच शेयर करा आणि आपल्या संपर्कात असलेल्या लोकांना ही माहिती पोहचवा. पुन्हा भेटू.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!