Loading...

खोट बोलतोय EVM हैकर ? EICL आणि College काही वेगळच सांगत आहेत !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

रंगभूमीवर सारखी नवीन नवीन नाटकं येत असतात, वेग वेगळे विषय घेऊन. पण आता राजकारणात सुद्धा नवीन नवीन नाटकं यायला लागलीत. एका पेक्षा एक भन्नाट असतात ही नाटकं. दर चार आठ दिवसांनी नवीन नाटक समोर येतं , एखादं नाटक सगळं देशच ढवळून काढतं, त्यातलं खरं खोटं कळेपर्यंत चालू राहते त्याचीच हवा. सगळे लोक सुद्धा चवी चवीनं घेतात त्याची मजा. कोण खुश होतं, तर कुणी तापतात. कोणी मारतात टोमणे. अशी काही दिवस मस्त मज्या आणतात ही राजकीय नाटकं.

नुकतंच एक नाटक आणलंय रिकाम्या बसलेल्या लोकांनी , म्हणजे आपल्या देशातील आज पर्यंत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरोधी पक्षानं. देशभर झाली त्याची जाहिरात. जो तो करतोय ह्याच नाटकाची चर्चा. ह्या नाटकाचं नाव आहे “EVM हॅकिंग”. हे नाटक खूप महिने चालू आहे. आणि आता नवीन ‘सनसनीखेज’आरोप प्रत्यारोपंच नाटक आलंय लोकांच्या समोर.. कोण सूत्रधार? कोण ऍक्टर, हे लोकांना आधी काहीच माहिती नव्हतं. आणि आलं ना राजकीय रंगभूमीवर हे नवीन कोरं नाटक. ह्याचा नायक म्हणजे ‘सैयद शुजा’. कोण , कुठला, कोणाला माहिती नाही असा. पण दावा करतोय की मी EVM मशीन हॅक करू शकतो. तो म्हणे मी डिझाइन इंजिनिअर आहे त्या मशीनचा.

Loading...

निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात हे मशीन कोणीही हॅक करू शकत नाही. म्हणून देशभर ज्यांना कुणाला शंका आहे त्यांनी मशीन मधला दोष काढून दाखवा अशी जाहीर घोषणा केली त्यावेळी अनेक तज्ञ मंडळी निवडणूक आयोगाच्या त्या घोषणेला प्रतिसाद देऊन प्रयत्न करून गेली होती. आणि हा “सैयद शुजा” त्यावेळी आला नाही कोणाच्या समोर. आणि आता लंडनहून म्हणजे ६७०० किलोमीटर दूर अंतरावर बसून म्हणतोय की मी हॅक करू शकतो. आणि ही माहिती कोणी दिली तर भारतातला सगळ्यात मोठा जबाबदार राजकीय पक्ष काँग्रेस च्या एका वकील नेत्यानं. हा नेता पेशाने वकील आहे. आणि तो जबाबदार नेता म्हणजे ‘ कपिल सिब्बल’. त्या सैयद शुजाने घेतली होती एक पत्रकार परिषद आणि त्या पत्रकारांना त्याने हे सगळं सांगितलं.

ह्या सैयद शुजा च्या दाव्यावरून ECIL ह्या EVM मशीन बनवणाऱ्या कंपनीत चौकशी केली गेली. पण ह्या कंपनीत सैयद शुजा ऊर्फ सैय्यद हैदर अहमद अशा नावाचा कोणीही डिझाइन इंजीनिअर नाही आणि नव्हता अशी माहिती मिळाली. आणखी पुढची गोष्ट म्हणजे शादान कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजि ह्या महा-विद्यालयात सुद्धा त्याच्या नावाची चौकशी झाली. पण तिथेही ह्याचं नाव गेल्या अनेक वर्षात नसल्याची खात्री करून घेतली गेली. ह्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. अतिक हे म्हणतात की तरी सुद्धा सैयद शुजा दावा करत असेल तर त्याने तशी कागद पत्र सादर केली पाहिजेत. मग पूर्ण शहा-निशा करता येईल. पण सैयद शुजा ह्या गोष्टीला अजून पुढे आलाच नाही. मग आता हा त्याचा दावा खरा का खोटा ?

Loading...

हा सैयद शुजा मूळचा भारतीय नागरिक म्हणवतो आहे. पण राहतो अमेरिकेत , आणि पत्रकार परिषद घेतो लंडनमध्ये. ह्याचं काय कारण ते अजून कळायचं आहे. ECIL कंपनीत २०००च्या वर कामगार आहेत त्यातले ८०टक्के कामगार ह्याच मशीनच्या कामात गुंतलेले आहेत. सैयद शुजा ऊर्फ सैयद हैदर अहमद च्या आई वडिलांच्या नावाची पण चौकशी केली गेली. आणि ह्या कंपनीतून ह्या नावाचा कोणीही व्यक्ती अमेरिकेत शिफ्ट झालेला नाही असे सूत्रांनी सांगितले आहे. मग हा सैयद शुजा सायबर एक्सपर्ट कुठून झाला? हा प्रश्न तर उभा राहतोच. पण त्याने त्याचे सगळे कागद पत्र कॉलेजला दिले नाहीत म्हणून हा काही खोटं बोलत असावा अशी शंका सुद्धा उभी राहते.

काँग्रेसला EVM मशीन नको आहे. आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोणताही गैर प्रकार होऊ नये म्हणून हेच मशीन पाहिजे आहे. म्हणून ही खोटी खेळी काँग्रेस पक्ष खेळतो आहे अशी खात्री बी जे पी चे नेते रविशंकर प्रसाद देतात. पुराव्या शिवाय कोणत्याही गोष्टी सिद्ध होत नाहीत त्यामुळे खरे पुरावे सैयद शुजा जो पर्यंत देत नाही तो पर्यंत त्याने केलेला दावा खोटा ठरतो आहे. कारण कपिल सिब्बल हे वकील आहेत त्यांचं काम खोट्यातून खरे शोधून ते लोकांसमोर ठेवायचे आहे. म्हणून पुरावा दिल्याशिवाय एक जबाबदार नेता खऱ्या किंवा खोट्या गोष्टीचे समर्थन कसे करू शकतो ? म्हणून ही काँग्रेसचं सत्तेसाठी केलं जाणारं नवं नाटक आहे का? का सैयद शुजा त्याचे सगळे खात्री पुरावे देऊन ही हॅकिंग खरी करून दाखवू शकेल? का भारतीय जनतेचे अशाच नवीन नवीन नाटकांनी निवडणुका होईपर्यंत मनोरंजन होणार आहे का? पण आता भारतीय नागरिक इतका अडाणी राहिलेला नाही. काय खरं आणि काय खोटं हे आता सगळ्यांनाच कळायला लागलं आहे हे मात्र खरं आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.