वयाच्या ५८ व्या वर्षी नोकरीतून निवृत्त का करतात..? जाणून घ्या इतिहास.

0

जॉब रिटायरमेंट जवळ आली की आपल्याला खूप चिंता आणि त्याच बरोबर समाधानही वाटते. समाधान ह्यासाठी की आयुष्यभर केलेल्या कष्टाचं चीझ होणार असतं. मुलं नातवंड ह्यांच्यामध्ये आता अपण वेळ घालवणार असतो. राहून गेलेल्या कला, छंद जोपासणारे असतो. मित्रमंडाळी, नातेवाईकांमध्ये बसून गप्पा ठोकणार असतो. आपल्या जोडीदाराबरोबर ‘मच अवेटेड वेकेशन’ वर जाणार असतो.

पण इतके सगळे असताना चिंता ही असतेच. रविवारची सुट्टी सोडली तर उद्या पासून दिवसभर घरात काय करायचं..? जोडीदार किंवा नातवंड आपल्याला ‘घरात बसून चकाट्या पिटतात’ असे तर नाही ना म्हणणार..? मुलं आपल्याला वृद्धाश्रमात तर नाही ना टाकणार..? एक ना दोन डोक्यात चक्र मात्र गरगर फिरतात नाही का..?? पण ही नोकरीमधली निवृत्ती म्हणजे बोली भाषेत रिटायरमेंट सुरू कोणी केली ब्वा..? आणि कशाला..?

जरा एखाद दोन शतकं मागे जाऊयात. १७०० – १८०० च्या काळात भारतात ही संकल्पनाच अस्तित्त्वात नव्हती असे म्हणायला हरकत नाही. मात्र वडील थकले की मुलगा आपसूकच त्यांच्या जागी कामाला लागायचा. नोकरीतून निवृत्ती गोऱ्यांच्याकडे भारतीयांच्या नोकऱ्या सुरू झाल्यावर सुरू झाली. तीही १९०० च्या शतकात..!! पण भारताबाहेर मात्र रिटायरमेंट आणि त्यानंतरचे मिळणारे पेन्शन ही प्रथा जरा आधी पासून होती.

अठराव्या शतकात म्हणजे १७०० च्या सुमारास माणसाचे कार्यकाल आयुर्मान साधारण पन्नाशी पर्यंत असायचे त्यामुळे शारीरिक थकव्यांमुळे किंवा निष्क्रीयतेमुळे घरी बसण्याची वेळ तेव्हा कधी आली नाही. १८०० नंतर म्हणजेच एकोणिसाव्या शतकात मात्र माणसे ७० च्यापुढेही कामे करू लागले. त्यामुळे शारीरिक कमजोरींमुळे त्यांच्या कामामध्ये अडथळे येऊ लागले. त्यामुळे अशा वृद्धांनी घरी बसणे योग्य होते.

अठराव्या शतकात इंग्लंड मध्ये कॉटन मॅथर ह्या एक मिनिस्टर ने सरकारला सुचवले की ह्या वृद्धांना घरी राहण्याचा सल्ला देऊ. जेणे करून ते वयाची संध्याकाळ मजेने घालवू शकतील आणि अशा पद्धतीने रिटायरमेंट अस्तित्त्वात आली. १८८३ च्या जर्मन चान्सलर ओट्टो बिसमार्क ने नवीन कायदा काढला की ६५ च्या वरच्यांनी निवृत्ती घेतल्यास त्यांना पेन्शन म्हणजेच मरेपर्यंत आर्थिक मदत सरकार कडून मिळेल.

आणि जर्मनी च्या राजाने ह्याला दुजोरा दिला. १८०० च्या मध्यनंतर अमेरिकीतही अग्निशमन दलाचे कर्मचारी, शिक्षक वर्ग, इतर सरकारी कामगार ह्या सगळ्यांना निवृत्ती आणि पेन्शन दोन्ही द्यायला सुरुवात केली आणि १९२० अमेरिकीत सगळ्या क्षेत्रात निवृत्ती आणि त्यानंतरचे पेन्शन देण्यास सुरुवात झाली.

अनेक देशात अनेक वेगवेगळे कायदेही ह्यावर बनले. १९०० च्या मध्यापासून शारीरिक क्षमतांच्या अडचणींवर मात करण्यासाठी वेळ आधीही निवृत्ती मिळण्यास मुभा म्हणजेच वोलेंटरी रिटायरमेंट सुद्धा मिळायला लागली. आता एकविसाव्या शतकात मात्र निवृत्त लोकांना जे शारीरिक दृष्ट्या फिट अँड फाईन आहेत त्यांना पुन्हा नोकरी करण्याची संधीही नाकारली जात नाही.

पुढच्या शतकात काय होईल माहीत नाही पण मंडळी तूर्तास आयुष्यात काही राहिलं असेल ते निवृत्ती नंतर मजेत करा.. नाहीच जमलं तर पुन्हा नोकरी शोधा कारण ५८ हा फक्त एक आकडा आहे निवृत्ती मात्र तुमच्या मनावर आहे, नाही का..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!