निवडणूक आयोग शिक्षकांची नेमणूक का करतो?

0

जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या नुकत्याच तारखा जाहीर झाल्या आहेत. होय, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लहानपणा पासून बघतोय कि निवडणुका आल्या कि निवडणूक आयोगवाले शिक्षकांना कामावर लावून देतात, या गावी जा, त्या गावी जा. दूरवर प्रवास करा, कधीकधी तिकडे थांबावं देखील लागते आणि मग त्या जागी बूथ लावून सायंकाळ पर्यंत काम आटपवून बरोबर त्यांचे आयोगाचे समान त्यांना पोहचते करून द्या.

मला हा प्रश्न नेहमी पडायचा कि निवडणूक आयोग स्वतःचे माणसं का पाठवत नाही किंवा एखाद्या खाजगी कंपनीला का कॉन्ट्रक देत नाही या सगळ्या कामाचा? उत्तराचा शोध घेतला नाही एक एक प्रश्न सुटत गेला. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाकडे जेमतेम काही शे माणसे आहेत आणि ती माणसे फक्त प्रशासकीय काम करतात.

निवडणुकांच्या तारखा, पोलिंग बूथची माहिती, मतदार याद्यांची पडताळणी, निवडणुकींचा खर्च, इत्यादी काम पाहण्यासाठी ते लोकं कार्यरत असतात आणि शे पाचशे लोकं संपूर्ण देशात निवडणूक भरवून आणण्यासाठी स्वतः पोलिंग बूथ वर जाणे शक्य नाही. प्रत्यक्षात जमिनीवर उतरून, घरोघरी भेट देऊन माहिती गोळा करण्यासाठी आणि मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आणि त्या सतत अद्ययावत ठेवण्यासाठी जेवढे मनुष्यबळ लागते तेवढे निवडणूक आयोगाकडे नाहीच आणि म्हणूनच हे काम शिक्षकांना करावे लागते.

शिक्षकांचा यामुळे त्यांच्या शाळेतील कामावर होणारा परिमाण म्हणजे ते शाळेत गैरहजर राहणे म्हणजेच या काळात काम न करण्यासाठी त्यांना एक वैध कारण मिळते इतकेच. अन्यथा ह्या सरकारी शाळांमध्ये हजेरी काय असते आणि त्या शाळांचा एकंदरीत शैक्षणिक दर्जा काय असतो हे सर्वज्ञात आहे. सोबतच ज्या दिवशी निवडणूक असते बहुदा त्या दिवशी सरकार किंवा विभाग सुट्टीची घोषणा करतात म्हणजे त्या दिवशी शाळा नसते म्हणून या कामासाठी शिक्षकांची निवड केली जात असावी, शाळा नाही तर दुसरं काहीतरी काम करून घ्या.

मतदान घडवून आणणे हे देखील एक जबाबदारीचे काम आहे, नावं आणि याद्या अद्ययावत ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे आणि आपल्या शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षकांना यात प्राविण्य प्राप्त झालेलं असते म्हणून मला वाटते कि या कामात शिक्षकांची नेमणूक केली जात असावी.

निवडणूक आयोगाच्या एका अत्यंत जेष्ठ महिला अधिकाऱ्याची मुलाखत २०१७ दिवाळी मध्ये एका मराठी वृत्त वाहिनीवर झाला होता. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला होता कि आपल्या निवडणुकीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्या अद्ययावत नाहीत आणि त्यात अनेक मृत माणसांची नावे अजूनही आहेत. एकीकडे मृतांचे नाव खोडले नाही आणि काही तरुणांची नावे सामील केली गेलेली नाहीत, काही महिलांची नावे दोन प्रकारे आहेत, काही जणांची नावे दोन मतदार संघात आहेत वगैरे.

या मतदार याद्या सतत अद्ययावत ठेवणे हे फार मोठे आणि कायमस्वरूपी काम असल्यामुळे प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येचा प्रमाणात निवडणूक आयोग काही कर्मचारी का घेत नाही? यावर त्यांचे फक्त एकच उत्तर होते ते म्हणजे, त्यांच्या पगारावर होणारा वाढीव खर्च करण्याची केंद्र सरकारची ताकद नाही. खरे तर हे उत्तर अजिबात पटण्यासारखे नाही परंतू विविध खात्यातील रिक्त जागांचा विचार करता हि वस्तूस्थिती असणे सुद्धा अशक्य नाही.

सध्या तरी हे काम आपल्या शिक्षक विभागाकडे असते आणि कधी कधी त्या गावातील पोलीस-पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांना सुद्धा ही कामे बहाल केली जातात. सरकार फक्त निवडणुकीसाठी, निवडणूक आयोगात नवीन माणसे का नेमत नाही हे तर मला माहिती नाही पण शिक्षकच का नेमतात याचं उत्तर मात्र सापडलं. येत्या निवडणुकीला मतदान करून आपला देश घडवायला मदत करा आणि लेख आवडला असेल तर शेयर करायला विसरू नका. यात महत्त्वाची माहिती आहे; ती सर्वांपर्यंत पोहचवा. जय हिंद.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!