दोन्ही देशांसाठी काश्मीर का इतके महत्वाचे आहे ? जाणून घ्या कारण..

0

नमस्कार, शीर्षक पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि आजचा मुद्दा किती खास आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या देशासाठी. गेल्या सत्तर वर्षांपासून आपण एकाच विषयावर, एकाच देशाशी, एकाच गोष्टीसाठी लढत आहोत आणि ते म्हणजे काश्मीर. असं नेमकं आहे काय त्या काश्मिरात कि दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाही, काय आहे या काश्मीरच्या समस्येचे निवारण?

या समस्येचा तोडगा काय आणि कोण काढणार?  माझ्याही मनात हा प्रश्न आहे आणि तुमच्याही मनात पण हे सगळं शोधण्याआधी तुम्हाला माहिती पाहिजे कि काश्मीर मध्ये असं काय आहे कि ते आपल्यासाठी इतके महत्त्वाचे आहे. त्यावर माझा एक इतिहास, स्वातंत्र्य आणि विचारांच्या दृष्टिकोनाचा एक अभ्यास.

सविस्तर गोष्टी जाणून घ्यायला स्वातंत्र्यपूर्व किंवा नेहरूजींच्या काळात जाण्याची गरज नाहीच. आधीपासूनच जम्मू काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग आहे आणि अधिकृत रित्या तो भारताचा भाग आहे; मग सत्तेत कुणीही असलं तरी “काश्मीर मुद्द्यावर” कसल्याच प्रकारची जुळवाजुळव कुणी चालवून घेत नाही.

धार्मिक दृष्टीकोन – इथे आपण फक्त भारताच्या ताब्यातील कश्मीरबाबतीत बोलत आहोत. भारताने ज्या दिवशी पहिल्यांदा कश्मीरमध्ये शस्त्रसंधी स्विकारली तेव्हापासून भारत एक इंचही त्यापुढे गेलेला नाही. 1947, 1965, 1971, 1999 ला संधी मिळूनही भारताने पाकव्याप्त कश्मीर मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. खरंतर भारताला त्या भागात एवढी रुची नव्हतीच आणि आजही नाहीच.

1995 /96 साली अखंड जम्मू कश्मीर भारताचा भाग आहे आणि पाकव्याप्त कश्मीर परत मिळवण्यासाठी एक ठराव भारतीय संसदेत सर्वसम्मंतीने पास केलेला आहे. तो निव्वळ प्रतिकात्मक आहे. 1965च्या युद्धात देखील कश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याची सरशी होत असताना भारताने आंतरराष्ट्रीय सिमा पार केली होती.

कश्मीरमध्ये भुगोल पाकिस्तानला अनुकूल आहे आणि त्याचा लाभ घेऊन जर पाकिस्तान तेथील भारतीय नियंत्रण कमजोर करण्याचा प्रयत्न करेल तर भारत आंतरराष्ट्रीय सिमा पार करण्यास कचरणार नाही. कश्मीरात जर पाकिस्तानी दावा मान्य केला तर तो भारतीय धर्मनिरपेक्षतेचा पराभव व जीनांच्या बांग्लादेशात पराभूत झालेल्या द्विराष्ट्र सिंद्धांताचा विजयच असेल. यापुढची गोष्ट अशी की, भारतातील उरलेल्या वीस कोटी मुसलमानांनाचा वकील म्हणून पाकिस्तान आपल्या समोर उभा टाकेल. हे धर्मयुद्ध भारताच्या मुख्य भागात येईल… त्यामुळे कश्मीरवर भारत आपला ताबा कधीही सोडणार नाही.

चीनची भूमिका: पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीर मधून काराकोरम राजमार्गाद्वारे चीनशी आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध जोडून ठेवले आहेत. अश्या या शत्रू राष्ट्रांसाठी हा रस्ता म्हणजे दुर्बीण; तेत्थून त्यांची नजर भारतावर नेहमीच खिळली असते आणि म्हणूनच भौगोलिक रित्या हे काश्मीर हे खूप महत्त्वाचे आहे. सियाचीन सारखी युद्धभूमी देखील काश्मीरमध्येच आहे आणि दोन्ही देशाचे सैन्य आपली भिकारी नजर काश्मीरवर लावून बसले आहेत.

पाकिस्तानची बाजू: मुस्लीम बहुलता आणि त्याची सीमा पाकिस्तानशी लागत असल्यामुळे कश्मीरवर आमचाच हक्क असल्याचे पाकिस्तानचे मत आहे. द्विराष्ट्रवाद जरी आपण नाकारला तरी फाळणीच्या नियमानुसार त्याचा दावा वैध आहे. एक हिंदूबहूल भाग भारतात तर मुस्लीम बहूल भाग पाकिस्तानात जातील. दोन भौगोलिक स्थान. याच गोष्टींचा मुलभूत आधार धरता भारत-पाकिस्तानची फाळणी करण्यात आली होती.

अशा परिस्थितीत सार्वमत जर फुटीरवादी व पाकिस्तानवाद्यांनी जिंकले तर त्याचे परिणाम उर्वरित भारतातील मुस्लीम लोकांना भोगावे लागतील याची राजकीय दृष्टिकोनातून जागरुक असलेल्या कुणासही सहज कल्पना येईल आणि याच कारणामुळे भारत “आपलं काश्मीर” पाकड्यांच्या ताब्यात जाऊ देत नाहीये. अपेक्षा आहे हा लेख तुम्हाला आवडला असेल; जर आवडला तर नक्की शेयर करा आणि प्रत्येक भारतीयाला आपल्या काश्मिरचं महत्त्व सांगायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!