आज जागतिक महिला दिवस. पण नेमका ८ मार्च हाच दिवस जागतिक महिला दिवस म्हणून का निवडला असावा ?

0

आजचा दिनविशेष म्हणजे जागतिक महिला दिवस. पण नेमका ८ मार्च हाच दिवस जागीतिक महिला दिवस म्हणून का निवडला असावा? या प्रश्नाचे उत्तर बहुतांश लोकांना माहिती नाहीये. जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि International Women’s Day (IWD) म्हणजेच जागतिक महिला दिन दर वर्षी ८ मार्च रोजी जगभर का साजरा केला जातो?

महिला दिनाचा इतिहास बघितला असता सुरुवातीला हा दिवस अमेरिकेमध्ये सोशलिस्ट पार्टी च्या सांगण्यावरून दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी साजरा केला गेला. तुम्हाला माहितीच आहे आधी महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी सोशलिस्ट इंटरनेशनल च्या कोपेनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.

पण या दिवसाचे महत्व अजूनच वाढले जेंव्हा फेब्रुवारी १९१७ मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिलांनी “bead and peace” साठी आंदोलन केले आणि नंतर ते हळू हळू वाढत गेले व रशियात सत्तेत असलेल्या जार ला सत्ता सोडावी लागली. त्यानंतर जी सरकार तयार झाली त्यामध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला.

रशिया मध्ये जेंव्हा आंदोलन सुरु झाले होते तेंव्हा तिथे ज्युलिअन कालनिर्णय वापरत होते (आता आपण सगळे ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरला जातो). ज्यानुसार फेब्रुवारी चा अखेरचा रविवार हा २३ तारखेला होता परंतु जगभरात त्यावेळी ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरत असल्यामुळे आणि त्या कालनिर्णयानुसार २३ फेब्रुवारी हा दिवस बाकी जगभरात ८ मार्च होता. म्हणूनच ८ मार्चला जगभरात जागतिक महिला दिनाच्या स्वरुपात मनाला जातो.

भारतात पहिला-वहिला महिला दिवस हा ८ मार्च १९४३ रोजी मुंबई येथे साजरा झाला. सन १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा देखील काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.

तर हा होता इतिहास जागतिक महिला दिनाचा, अपेक्षा आहे कि तुम्हाला नव्याने काही माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रापरीवारासोबत शेयर करायला विसरू नका. स्टार मराठीच्या वाचक वर्गातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!