तुम्हाला माहिती आहे का मायावती नावासमोर सुश्री का लावतात ? जाणून घ्या या मागची खरी कहाणी …

0

आता ट्विटर कोण वापरत नाही. तो व्यक्ती सेलिब्रिटी असो वा सिनेकलाकार, एक सामान्य नागरिक असो वा देशाचा पंतप्रधान, आज प्रत्येकजण ट्विटरवर आहे. जर तुम्हाला माहिती नसेल ट्विटर काय आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो कि ट्विटर हा एक मायक्रोब्लॉगिंग मंच आहे जिथे २८० अक्षरांत आपण आपले मत व्यक्त करू शकता. आज ट्विटर पुन्हा एकदा चर्चेत आहे कारण बहुजन समाज पार्टीची अध्यक्षा मायावती यांचे ट्विटरवर आगमन झालेले आहे. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी मायावती ट्विटरवर आल्या आणि येत्या बरोबर चर्चेला उधाण आलं. चर्चेचे कारण आहे मायावती यांचे युजरनेम. ट्विटर वेरीफाईड असलेल्या या अकाऊंटचे युजरनेम आहे @SushriMayawati. नेटकऱ्यांना प्रश्न पडला कि सुश्री म्हणजे नेमकं काय आणि मायावतीने हे का वापरलं असावं. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

सामान्यतः मायावतीच्या नावासमोर सुश्री लिहिलं जाते पण नेमका हा शब्द आला कुठून आणि त्याच्या नेमका अर्थ काय आहे याचा अंदाज बहुतांश लोकांना नाहीये. या शब्दामागील कथा नुकतीच त्रिभुवन यांनी फेसबुकवर शेयर केली आहे. त्रिभुवन यांची गोष्ट मान्य केली तर हिंदीचे प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन यांनी त्रिभुवन यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात असं लिहिलं होतं कि हिंदीची प्रसिद्ध पत्रिका पल्लवच्या संपादनाची जबाबदारी कवी सुमित्रानंदन पंतकडे होतं. त्या काळात अनेक युवतींच्या कविता छापण्यासाठी यायच्या. अश्या अनेक युवती असायच्या जांच्या नावासमोर ना कुमारी लागलं असायचं आणि ना ही श्रीमती. अश्यावेळी पंत गोंधळून जायचे कि त्यांच्या नावासमोर कुमारी लिहावं कि श्रीमती?

त्याकाळात टेलीफोनही फारच कमी होते, मोबाईल तर नाहीच नाही. अश्या वेळी त्यांची वैवाहिक स्तिथी काय आहे हे माहिती करणे कठीणच होते. मग सुमित्रानंदन पंत यांनी मध्य मार्ग काढला. ज्यांची वैवाहिक स्तिथी माहिती नाही अश्या महिलांसमोर त्यांनी सुश्री लिहिणे सुरु केले. हा शब्द कुमारिकांच्या नावासमोर पण लागू शकत होता आणि विवाहित महिलांच्या नावासमोर सुद्धा. नंतर गोष्टी बदलल्या. अविवाहित महिलांच्या नावासमोर कुमारी वापरायला सुरुवात झाली आणि विवाहित महिलांच्या नावासमोर श्रीमती. निरेंद्र नागर, वरिष्ठ पत्रकार आणि नवभारत टाईम्सचे संपादक राहिले आहेत; ज्ञानमंडळ शब्द्कोशानुसारही याचा अर्थ असाच आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे कि हिंदी मध्ये सुश्री लिहिण्याचा संदर्भ घेतला आहे इंग्रजीच्या मिस “Miss” या शब्दापासून.

१७००व्या शताब्दीत Ms वापरल्या जायचं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी Mr वापरल्या जायचं. पण नंतर गोष्टी बदलल्या आणि या शब्दांचा वापर बंद झाला. पण मग सुरुवात झाली नारीवादी आंदोलनाला. महिलांनी आवाज उठवला कि पुरुषांसाठी असा शब्द नाही ज्याने त्यांची वैवाहिक स्थिती कळते मग महिलांसाठी का? आणि मग Ms हा शब्द प्रचलनात आला आणि याचं उच्चारण ठेवलं मिज आणि हिंदीमध्ये या शब्दाचे रुपांतर हिंदीमध्ये सुश्री म्हणून झाले.

गोष्ट सुरु झाली होती ती मायावतीपासून तर त्यांच्यावरच संपवूया. त्यांचे समर्थक जेव्हाही तिचे पोस्टर लावतात तर तिथे लिहितात सुश्री बहन कुमारी मायावती जी आणि बीएसपी काडेरमध्ये सुद्धा त्यांना बहनजी याच नावाने संबोधले जाते. आधी अखिलेश यादव सुद्धा बुआ नावाने संबोधायचे पण मग जेव्हा गठबंधन झालं तेव्हापासून ते सुद्धा बहनजी या नावाने संबोधायला लागले. आधी बातमी आली कि मायावती ट्वीटरवर आल्या आहेत, अकाऊंट खरं आहे कि खोटं पण मग गोष्ट आली ती त्यांच्या युजरनेमवर. पण आले नेटकऱ्यांचे प्रश्न आणि पत्रकारांच्या पोस्ट.

एवढे मोठे पुरण सांगण्यामागे तात्पर्य हेच आहे कि भाषा कि कशी प्रवास करते आणि मग संपन्न होत जाते. एका राजनेत्याच्या ट्वीटर अकाउंटमुळे का होईना; आपल्याला या गोष्टीची माहिती द्यावीशी वाटली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आणखी एक गोष्ट आम्ही सुद्धा ट्विटरवर आहोत @StarMarathi नावाने आणि मी @DatarkarSN नावाने. तर आम्हाला तिथे फॉलो करायला विसरू नका. “फॉलो” हा बरोबर शब्द नाहीये पण ट्वीटर याच शब्दाचा वापर करतो.
चला तर मग पुन्हा भेटू मंडली, एखाद्या दुसऱ्या व्हायरल बातमी सोबत !!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!