Loading...

न्यूझीलंड च्या तोंडातला घास ओढून खाणारा इंग्लडं ! संघर्षमय खेळ करून इंग्लडं ने जिंकला विश्वचषक ! पण…..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

आज पहिल्यांदा भारतीय टीम फायनल खेळत नसतानाही क्रिकेट चा आनंद घेणं सुटत नव्हतं. क्रिकेटप्रेमी असणाऱ्यांच्या नजरा कालच्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या फायनल च्या सामन्याकडे होत्या. जगाला विश्वचषक विजेता मिळणार होता. बक्षीस एक होतं आणि दावेदार दोन होते. सामना अटीतटीच्या भिंतीवर होणार होता. रोमांच शिखरावर जाणार होता. आणि झालंही अगदी तसच. सामना सुरू झाला ते न्यूझीलंड ने टॉस जिंकून. पहिली फलंदाजी करण्यासाठी संघ सज्ज झाला.

आशा ,आकांशा , हे सगळं दोन्हीही टीम च्या फॅन्स च्या गगनाला भिडल्या होत्या. भारतीय प्रेक्षक सुद्धा मैदानात आणि टीव्हीवर मॅच बघत होता. इंग्लड च्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. आणि आक्रमक होत जाणाऱ्या न्यूझीलंड ला रोखण्यात यश आणलं. न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघा समोर संघर्षाचा खेळ करत २४१ चं लक्ष दिलं. इंग्लड करून ख्रिस ऑक्स ने यात मोठा वाटा उचलला. त्याने तीन फलंदाजाला माघारी पाठवले.

Loading...

पुढे वर्ल्डकप जिंकून जगाच्या इतिहासात नाव करायचं. मायभूमीचा अभिमान वाढवायचा. कर्मभूमीची शान गर्वाने उंच आणि इंग्लड वासीयांची मान ताठ करायची. असे अनेक स्वप्न घेऊन संघ मैदानात उतरला. अप्रतिम खेळ करून, मॅच जिंकून पहिल्यांदा या वर्ल्डकप चा मानकरी ठरायचं. असं सगळ्या इंग्लड क्रिकेटर व क्रिकेटप्रेमी यांनी मनाला ठणकावून सांगितलं होतं. त्यांच्या खेळातून प्रचंड जिद्द दिसत होती. जो चांगला खेळ करतो नशीब नेहमी त्याचीच साथ देतो. जो मनापासून प्रामाणिकपणे खेळतो नशीब त्याच्या मागे धावून येतं. क्षण ना क्षण जोर लावून खेळलं की नशीब सुद्धा मागे धावायला लागतं. इंग्लडचं सुरुवातीला तसचं झालं. पण नंतर मात्र त्यांच्या सगळ्या आशा व्हेंटिलेटरवर गेल्यासारख्या झाल्या. मग काय जगतोय की मरतोय ! अशी बिनभरवशाची आशा !..

संथ खेळ फायनलचं प्रेशर आणि ढासळती विकेट यांमुळे इंग्लड ची जिंकण्याची अस्मिता काही काळासाठी धोक्यात आली होती. पण जसं भारतीय संघाकडे ms धोनी असतो तसच त्यांच्याकडे बेन स्ट्रोक होता. त्याच्या भेदक बॅटिंग मुळेचं इंग्लड हा अटीतटीच्या सामन्यात जिवंत राहिला. म्हणजेच हा सामना टाय झाला. ह्याचं बेन स्ट्रोक ने २०१६ चा टी -२० वर्ल्डकप मिळवून देऊन आणि मोठ्या वर्ल्डकप ची आशा जिवंत महेंद्रसिंग धोनी होण्यात त्याने कोणतीच कसर सोडली नाही.

सुपर ओव्हर ! ५० षटकात विजेतावीर ठरवणाऱ्या या खेळात आता फक्त एका ओव्हर मध्ये विजेता ठरणार होता. दोन्ही ही संघ तयार होते. एकमेकांच्या तोंडात जायला लागलेला घास हा संघर्ष करत एकमेकांना खाऊ न देणारे हे दोन्ही संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर होते. कारण आता मॅच टाय जरी झाली तरी ती पुन्हा सुपर ओव्हर होणार नव्हती. मॅच सुरू झाली. संघर्षाची गाथा दोन्हीही टीम मधले खेळाडू गायला लागले. इंग्लड ने पहिल्यांदा बॅटिंग केली. आणि न्यूझीलंडच्या संघासमोर आव्हानात्मक आव्हान उभं केलं.

Loading...

एका ओव्हर मध्ये इंग्लड ने १५ रन काढले होते. न्यूझीलंड ला हे टार्गेट सोपं ही नव्हतं आणि अवघडही. पुन्हा संघर्ष सुरू झाला. आणि पहिल्यांदा मनाने उसास भरला. श्वास रोखून धरला. काय होतंय ? जिकणं किंवा हरणं कुणाच्या पदरात पडणार ? अश्या प्रश्नाचे काहूर मनी वाजायला लागले. कारण न्यूझीलंड ला पुन्हा एका बॉल मध्ये २ रन लागत होते. शेवटी जे आधी झालं तेचं झालं. सामना पुन्हा टाय झाला. पण इथंच जगाला नवा विश्वविजेता मिळाला. आणि त्याचं नाव होतं “इंग्लड ” …कारण ज्या संघाने सगळ्यात जास्त चौकार मारले त्याला विजेता घोषित केलं जाणार होतं.

हा नियम जरा संकुचितपणा आणणारा वाटला. कारण शेवटी क्रिकेटचं जिंकलं आणि त्यांच्यासोबत दोन्ही टीम सुद्धा जिंकल्या. पण नियम थोडेसे हरल्यासारखे वाटले. जिथं खेळच महत्व जर नियम कमी करत असेल तर तो नियम नियम कसला ! ..जो संघ हरला. तो हरलाच नव्हता. जो संघ जिंकला नव्हताच. जिंकले दोघेही. पण त्यात इंग्लडं ने नियमसूत्र वापरून ,त्यात अग्रेसर येऊन बाजी मारली. नावाला इंग्लडं ने वर्ल्डकप जरी न्हेला असला तरीही न्यूझीलंड ने दिलेली झुंजार झुंज जिंकण्याची मोहक आकृतीच. शेवटी म्हणतात ना की संघर्ष करत राहायचं. यश कधी ना कधी नक्की भेटेल. इंग्लडला मात्र पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून खूप मोठं यश भेटलं होतं. ते त्यांच्या हाती लागलं होतं.

आपला देश खेळत नसतानाही पहिल्यांदा वाटलं की कुणीही जिंका ! पण लवकर जिंका. कारण या क्रिकेट खेळांन जे वलय निर्माण केलं आहे ते खूप वेगळं आहे. आनंददायी आयुष्य देणारं आहे. खेळ खेळामध्ये कसं जीव ओतून रसिकांना आनंद देतोय हे फायनल च्या क्रिकेट खेळामधील एक उदाहरण. खरचं जगात काहीही असो संघर्ष असला तर त्यात मजाय नाहीतर सबकुछ बस कुछ कुछ ही हैं !! नहीं तो कुछ भी नहीं हैं.

लेखक :- कृष्णा विलास वाळके

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.