‘झोपेचाही’ जागतिक दिवस असतो. झोपप्रिय मंडळी तुम्हाला माहीत आहे का हे..??

0

‘इंटरनॅशनल डेज’ आणि त्यांचं सेलिब्रेशन हे नव्या युगाचं नवीन फॅड आहे..!! रोज कोणते ना कोणते दिवस त्या त्या दिवसाच्या महत्वाप्रमाणे साजरे केले जातात. तर मंडळी आजच्या दिवसाची खासियत तुम्हाला नक्कीच आवडेल. आज असा दिवस आहे ज्याबद्दल सगळ्यांनाच खूप आत्मीयता असते, ते म्हणजे झोप.. होय आज आहे जागतिक झोप दिवस. हा दिवस वर्ल्ड स्लीप डे कमिटी ऑफ वर्ल्ड असोसिएशन ऑफ स्लीप मेडिसिन यांनी २००८ पासून सुरू केला. त्यांचे ब्रीद वाक्य आहे, ‘ चांगल्या झोपेचे स्वप्न साकारता नक्की येते’..!

मग आता ह्या दिवसाला साजरे कसे करणार बुवा..?? दिवसभर आणि रात्रभर झोपून..?? आणि मग काम धंद्याचं कसं काय..?? त्याचं असं आहे की आजच्या दिवशी ‘झोप’ ह्या सगळ्यांच्या आवडत्या क्रियेबद्दल सगळी माहिती घ्यायची.. कारण सुखाची झोप ही सगळ्यांनाव्ह मिळते असे नाही. काहींना खूप झोपेची अराधनाच करावी लागते म्हणा ना आणि अशा निद्रेची अडचण असणाऱ्यांसाठी, त्यांना झोपेबद्दलचे ज्ञान देण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा होतो. चांगली झोप मिळवणे हे स्वप्न नससून त्यासाठी ३ गोष्टी महत्त्वाच्या असतात.

१. झोपेचा कालावधी: म्हणजे तुम्हाला किती वेळ शांत झोपेची गरज आहे २. झोपेची एकसलगता म्हणजेच कॅन्टीन्युटी: कसल्याही चिंता विरहीत मिळालेली एक सलग झोप. ३. गाढ झोप: काही खुट्ट झाल्यावर जाग न येणारी गाढ झोप लागणे. वरच्या तीनही गोष्टी साध्य झाल्या म्हणजे तुम्हाला सुखाची झोप मिळाली..!! पण त्या साध्य करायच्या कशा म्हणताय..?? सोपं आहे..

१. सगळ्यात पाहिलं तर तुमचे सगळे गॅजेट्स वेळेत बंद करा. सोशल मीडिया, गेम्स आणि सीरिअल तुम्हाला झोपच देत नाहीत. त्यांच्यावर आवर घाला. झोप शरीरासाठी ह्या सगळ्या गॅजेट्सपेक्षा जास्ती महत्वाची आहे हे लक्षात राहू द्या की..! तरच ती गॅजेट्स तुमचा पिच्छा सोडतील..

२. सकाळी लवकर उठायची सवय जी शाळा सोडल्यापासून गेलीये, ती परत लावून घ्या. पहाटे उठाल तर दिवसभर फ्रेश वाटेल आणि तुम्ही तरतरीत राहाल. बर पहाटे लवकर उठल्यावर रात्री आपोआपच झोप येईल, नाही का..?!

३. व्यायाम पण करायचा बरं का..?? झोपायच्या किमान सहा तास आधी किंवा सकाळी उठल्यावर कोणत्याही प्रकारचा अंगमेहनती व्यायाम इस अ मस्ट..!! रनिंग, वॉकिंग, स्विमिंग, योग, नृत्य काहीही चालेल बंधो, पण शरीर कसं हलकं राहिलं पाहीजे..!!

४. गरमागरम पेय सुद्धा होऊन जाऊद्या झोपायच्या आधी. गरम मसाला दूध, कधी गरम लिंबू पाणी, कधी कॉफी आणि सध्याचा ट्रेंडिंग ग्रीन टी..! कोणतेही पेय रात्री झोपायच्या आधी एन्जॉय करा. म्हणजे झोप तर येणारच..!!

५. मात्र संगीत ऐकण्यासारखी थेरपी नाही राव.. तुमच्या आवडीची गाणी, चित्रपट संगीत, इन्स्ट्रुमेंटल काहीही ऐकणे म्हणजे एक वेगळ्याच विश्वात जाणे.. सुंदर संगीत लावून तर बघा, निद्रादेवी स्वतःहुनच तुम्हाला झोपेच्या राज्यात घेऊन जाईल..!!

तर दोस्तांनो ह्या झोप दिवसाचा पुरेपूर आनंद उपभोग..!! तुम्हाला आमच्या टिप्स कशा वाटल्या तेही कळवा..!! हॅपी स्लीप डे..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!