भारतातील हे 10 अजब गजब कायदे तुम्हाला माहितीही नसतील नक्की वाचा !

0

‘कायदा’ म्हटलं की आपल्यासारख्या सर्व सामान्य माणसाला जरा भीतीच वाटते, नाहीका? कारण कुठल्या भानगडीत न पडणारे आपण कायद्याच्या वाटेला पण कधी जात नाही. कायद्यांनी काही करायचं तर कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, वकील, हेलपाटे, डोक्याला ताप असल्या गोष्टींशी संबंध येतो. म्हणून ही भानगडच नको असं वाटतं, खरंय का नाही? त्यामुळं आपण कायद्याचं पुस्तक घेऊन ते काय काय कायदे आहेत हे वाचून आणि जाणून घेत नाही.

काय करायचंय आपल्याला ते कायदे जाणून घेऊन ,उगाच नसती उठाठेव. असं म्हणून जरा कानाडोळा च करतो आपण. पण आयुष्यात असे काही कायदे जाणून घेणं हिताचं ठरतं. कधी काही चुकीची गोष्ट आपल्याकडून घडू नये म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून ते माहिती असलेले बरं. काही छोटे छोटे कायदे असे आहेत की ते आपल्याला आयुष्यात कधी माहितीच नसतात. आणि जर कुणी ते सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही असे काही कायदे बघा काही विचित्र वाटतील पण पाळायला पाहिजेत.

१- भारतीय कायदा : द एअरक्राफ्ट ऍक्ट 1934, ह्या कायद्या प्रमाणे पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय आकाशात पतंग उडवणे, किंवा गॅसचे फुगे आकाशात सोडणे हा गुन्हा आहे. 

२- Indian Sarai Act 1867  : नुसार भारतीय नागरिक कोणत्याही हॉटेलमध्ये पिण्यासाठी पिण्याचे पाणी मागू शकतो आणि ते पाणी त्या हॉटेलमध्ये मोफत दिलं गेलं पाहिजे. आणि टॉयलेट ची सोय सुद्धा मोफत दिली गेली पाहिजे.जरी ते हॉटेल सप्त तारांकित असेल तरी.

३-केरळ मध्ये तर लग्न झालेल्या जोडप्याला दोन मुलांच्या वर तिसरे मूल झाले तर ₹.१००००/- दंड द्यावा लागतो.

४- The Land Acquisition Act 1894 नुसार सरकार तुमची आमची जमीन कधीही खरेदी करू शकते.

५-सूर्य मावळल्या नंतर किंवा सूर्य उगवण्या पूर्वी पोलिसांना : कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही. अगदीच जर एखादी सिरीयस केस असेल तर पोलिसांना माजिस्ट्रेटची लेखी परवानगी आणून नंतरच आशा महिलेला अटक करता येते.

 

६- वाहन चालवताना काही चूक तुमच्या हातून झाली आणि तुम्हाला दंड भरावा लागला तर तीच पावती रात्रीपर्यंत तुमच्या जवळ असेल तर पुन्हा दुसरा दंड भरावा लागणार नाही. म्हणजे जर हेल्मेट न वापरल्यामुळे तुम्हाला जर पोलिसांनी सकाळी दंड केला असेल तर त्याच दिवशी रात्रीपर्यंत पुन्हा कोणी अडवल्यास ही दंडाची पावती दाखवल्यास पुन्हा दंड भरावा लागणार नाही.

७ – २०११ मध्ये मिनिस्ट्री ऑफ वूमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट ने एक कायदा केला आहे की कोणताही एकटा पुरुष माणूस कोणत्याही मुलीला दत्तक घेऊ शकत नाही.

८- Hindu Adoption and Maintenance Act 1956 ह्या कायद्या नुसार कोणत्याही हिंदू जोडप्याला जर एखादा मुलगा असेल तर पुन्हा त्या जोडप्याला दुसरा मुलगा दत्तक घेता येणार नाही.

९- इंडियन पिनल कोड च्या सेक्शन 309 नुसार कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि मृत्यू न होता बचावला तर १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होते.

१०- आंध्र प्रदेशमध्ये एक गमतीशीर कायदा आहे. तो म्हणजे मोटर व्हीकल इंस्पेक्टर होण्यासाठी त्या व्यक्तीचे सगळे दात चांगले असले पाहिजेत. हा कायदा कसा आणि कशासाठी केला गेला असेल ह्याचं आश्चर्य वाटलं नाही तरच नवल. काहीतरी चांगलाच उद्देश असेल पण तुम्ही सुद्धा चकित झालात ना?

असे आहेत काही कायदे, आणि त्यातल्या गमती जमती. पण आपण हे कायदे पाळले तर काहीच त्रास होणार नाही पण नाही पाळले तर होईल उगाचच डोक्याला ताप.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!